Sunday, June 26, 2011

Reelection.. to save Democracy...

खरच... कुठे चाललो आहोत आपण... कधी कधी सध्याची आपली राजकीय परिस्थिती पाहिली की अगदी मन सुन्न होते. विचार खुंटतात... कधी कधी रक्त ही खवळत... आणि सर्वात शेवटी वाटते नको ती लोकशाही... आम्हाला आज एका पर्यायी व्यवस्थेची नितांत आवश्यकता आहे... कारण ज्याची व्याख्या... लोकांचे.. लोकांनी.. लोकांकरता चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही.. ह्यातला लोक हा महत्वाचा घटकच दुर्लक्षित राहतोय...

आज देशात प्रचंड गदारोळ आहे.. कोणाचा कोणाला मेळ नाही... मला दाट शक्यता वाटते.. आपण पून्हा एकदा 1988 ते 1990 च्या अस्थिरतेच्या कालखंडाकडे वाट्चाल करत आहॊत. ज्या वेळेस आपल्या अर्थमंत्र्याना आपल्या देशाचे सोने गहाण ठेवावे लागले होते... आजचे राजकारणी आमचा सारा देशच विकायला निघाले आहेत... एक दिवशी सकाळी "Breaking News" पण येईल... " आमचा देश विकला गेला आहे." :( :( :(

एका देशाची प्रगती ही कायम देशाच्या राजकीय स्थिरतेवर अवलंबून असते. आणि अश्या अस्थिर वातावरणामुळे आपण नक्कीच पाच वर्षे मागे जाणार आहोत..

आमच्याकडे खरच लोकशाही आहे ???

ज्या ठिकाणी भ्रष्ट लोक हे लोकप्रतिनिधी असतात ती लोकशाही...???
ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी हा लोकहिताची कामे न करता स्वहिताच्या कामाला प्राधान्य देतॊ ती लोकशाही...???
ज्या व्यवस्थेचा वापर हा तत्वतः लोकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी असतो.. पण तो होत नाही ती लोकशाही...???
ज्या व्यवस्थेत जुन्या काळातील त्याग (?) आणि बलिदानाचे (?) दाखले देउन केवळ एका आडनावाच्या व्यक्तीकडे सत्ताप्रमुख पद देण्याचा अट्टाहास होतो ती लोकशाही...???

नाही.. ही लोकशाही नाही... जी लोकांसाठी नाही ती लोकशाही नाही... केवळ 35 आणि 40% मते मिळवणारे कसा दावा करु शकतात की ते बहुमत आहे..

आज आमचे देशाचे पंतप्रधान हे आजवरच्या इतिहासातील कार्यशुन्य पंतप्रधानांपैकी एक.. त्यांची अर्थशास्त्रातली कारकिर्द, अभ्यास वादातीतच आहे... पण आज त्यांची त्याच्या मंत्रीमंडळावरली पकड ढिली आहे हे ही सत्य.. त्यांचे संपुर्ण मंत्रीमंडळ भ्रष्टाचारात बुडले आहे .. हे ही सत्य.. आता ह्याला पर्याय काय...
विरोधी पक्ष.. अरे बापरे... ह्याच्याबाबत तर न बोललेलेच बरे... आमच्या कडे प्रखर विरोधी पक्ष आहे का नाही हाच मोठा प्रश्न आहे... त्यामुळे त्यांना सत्ता दिल्यावर पून्हा पहिले पाढे पंचावन्न च होण्याची शक्यता अधिक...

कोणीतरी आमच्यावर हुकुमशहा आणुन बसवावा हा पर्यायही अव्यवहार्य...

आज हा सारा मुद्दा आठवायचे कारण म्हणजे आण्णांचे "लोकपाल विधेयकासाठी चाललेले आंदोलन...
राजकारणात सारीच वाईट माणसे आहेत असे नाही.. काही चांगली माणसेही आहेत.. वाईट माणसांना निवडुन देउन आपण जी चुक करतो ती आपण सुधारली पाहीजे..

आण्णा आमचे तुम्हाला एक आवाहन आहे.. लोकपाल विधेयकानंतर आपल्याला आणि एका विधेयकावर लढायचे आहे.. आणि ते विधेयक म्हणजे.. मतदारसंघ फ़ेरनिवडणुक विधेयक...

काय असेल हे विधेयक.. काय असेल हा कायदा ... काय असतील त्यातले मुद्दे...

1. कोणत्याही लोकसभा मतदारसंघात 50% पेक्षा कमी मतदान झाल्यास पुनर्मतदान घ्यावे.
2. प्रत्येक मतदारसंघात मतदाराला "negative voting" करण्याचा हक्क आणि सोय असावी.
3. ज्या मतदारसंघात 50% पेक्षा जास्त "negative voting" झाल्यास तेथे पुनर्मतदान घ्यावे.
4. वरील मुद्द्यामुळे पुनर्मतदान झाल्यास आधीच्या सर्व उमेदवारांना पुन्हा उभे राहण्यास बंदी असावी.
5. निवडणुक ही पूर्ण पारदर्शक असावी. आणि प्रत्येक निवडणुक अधिकाऱ्याला संपुर्ण सुरक्षा पुरविली जावी.


वरकरणी पहाता हा खुप Bold .. अतिरेकी... सर्वसमावेशक नसलेला असा कायदा वाटेल.. पण तो तसा नाही आहे... सत्तापदापासुन भ्रष्ट , गुंड आणि वाईट प्रव्रुत्तींच्या माणसांना बाजुला ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. ह्या कायद्यामुळे आज जे मतदानापासुन पराव्रुत्त झालेले लोक मतदानात भाग घेतील. मतदान हे आपले कर्तव्य आहे याची त्यांना जाण येइल. आणि हा जो काही कायदा आहे तो काही नवीन नाही... आजही निवडणुक आयोगाकडे याचा "draft" तयार आहे.. पण तो आज प्रकर्षाने आठवण्याचे कारण आजची राजकीय परिस्थिती...

पण खरी "ग्यानबाची मेख" पुढे आहे.. हा कायदा मंजुर करुन घेणे हे सध्याच्या राजकारण्यांच्या द्रुष्टिने हितावह नाही.. त्यामुळे ह्या कायद्यासाठी पण आपल्याला आंदॊलन करावेच लागेल...

आण्णा आगे बढो .. हम तुम्हारे साथ है ....

~~~ मोCoool...

1 comment:

  1. If we consider the economical aspect of this "solution", we can immediately see, this is not good for our country. Reelection means double the cost (which is quite a lot), not only for politicians but also for election commission of India. And to fill-up that extra burden the taxes and other "economical things" have to suffer...

    I am an optimist, I do believe these things will change but we have to be careful and patient...

    ReplyDelete