वर्ष नवे हर्ष नवे ... नवे वर्ष नवी सुरुवात
नुकताच गुढीपाडवा झाला. नविन वर्षाची सुरुवात झाली. सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! अर्थात शुभेच्छा द्यायला थोडा अंमळ उशीरच झाला पण असो ... आता काही नूतन वर्षाचे संकल्प... आता तुम्ही म्हणाल " अरे संकल्प पहिल्या दिवशी करायचा असतो. एवढ्या उशिरा नव्हे." पण मी काय म्हणतो पहिल्या दिवशी संकल्प करून दुसऱ्या दिवशी विसरण्यात काय अर्थ आहे. परत " नव्याचे नऊ दिवस " हे वरतून आहेच . अरेच्चा आज तर नववाच दिवस आहे. (रामनवमी ...) क्या बात है.. म्हणजे आता संकल्पांचा विसर पडण्याची शक्यता नाही :)
तर नूतन वर्षाचे काही संकल्प असे...
१. कळसुबाई शिखर सर करायचे आणि किल्लेभ्रमंत्तीचे आणखी एक दशक...
२. बाबा आमटेंच्या आनंदवनात जाऊन श्रमसंस्कार शिबिरात भाग घ्यायचा ...
३. विठ्ठलाच्या वारीबरोबर पुणे ते सासवड पायी जायचे (ग्यानबा तुकाराम ) ...
४. पन्हाळा ते विशाळगड हा गुरुपौर्णिमेला होणारा ट्रेक पूर्ण करायचा...
५. एका दुर्गम गावातल्या शाळेत जाऊन पुस्तके द्यायची...
६. राजा शिवछत्रपती पुस्तकाची नवीन आवृत्ती वाचून काढायची...
अर्थात हे सर्वच संकल्प पूर्ण नाही होणार.. पण तरीही त्या स्वप्नरंजनात काही सुखाचे क्षण तर मिळाले... :)
~~~ मोCoool...