हो.. दहा वर्ष झाली पुण्यात येऊन अर्थात पुणेकर होऊन. असाच जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. नोकरीच्या शोधार्थ पुण्यात पाऊल टाकले होते. एक मनाशी पक्कं होतं. पुण्यात यायचं ते खुल्या मनाने. पुण्याला आपलं मानायचं. नाशिकबद्दल नक्क्कीच प्रेम होतं ... आहे. पण म्हणून पुण्यात आल्यावर या शहराबद्दल नकारात्मक भावना नाही ठेवायची हे पक्कं होत. पुणं समजून घ्यायचं. 'पुणे'कर व्हायचं ! कारण शेवटी 'गंगा गये गंगादास!! जमुना गये जमुनादास !!!'
आज दहा वर्ष झाली. आयुष्यातले बरेच महत्त्वाचे टप्पे ( नोकरी, घर, लग्न ) इथेच झाले. पुण्याने आणि पुणेकरांनी सामावून घेतले. खुप जवळचे मित्र लाभले.
वारी पासून सवाई पर्यंत,
गुडलक पासून गडभ्रमंती पर्यंत
आणि मिसळीपासून गणेशोत्सवापर्यंत !!!
खूप अनुभवलं इथे...
जिवाभावाचे मैतर लाभले.
धन्यवाद पुणे !!!
(ता.क.: कुठल्याही गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगायलाही शिकलोय आता !)