Saturday, November 20, 2010
काहीच्या काही अतर्क्य...
मी फ़ेकला जात होतो... आकाशातुन खाली .... प्रचंड वेगाने... अक्षरशः जीवाच्या आकांताने ओरडत होतो... वारा प्रचंड कापत.. प्रकाशाच्या दुप्पट वेगाने जमिनिकडे येत होतो....
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
आणि मी अखेर आदळलो... धप्पकन... पण केवळ एक किंचितशी कळ... मी जिवंत होतो... जिवंत ???...कसं शक्य आहे...
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
एवढ्या मोठ्या धक्क्यातुन सावरतो ना सावरतो.. तोच.. आणि एक धक्का...
पाठिवरची कळ सोसत उठण्याचा प्रयत्न करतो तोच.. पाठीवर काठीचा दणका आणि माझा परत एकदा धरणीमातेला साष्टांग...
फ़टक्याच्या दिशेने पाहिले तर माणसासारखं काहीतरी होतं ... पण माणुस नव्हता.... अर्धा काळा .. अर्धा गोरा... बदकाचे पाय असलेला.. तो अर्धांगी...
हा कोण .., आणि इथे कसा आला... आणि सगळ्यात पहिला प्रश्न ... हिंदी सिनेमासारखा... "मैं कहां हुं "...
तो अर्धा असा... आणि अर्धा तसा... एकटाचं नव्हता... असे बरेच लोक होते... आणि आश्चर्य म्हणजे ते सगळे एकसारखे होते... जणू काही एकाच साच्यातुन काढलेले...
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
फ़टक्याच्या दिशेने बघितल्यावर तो बहुतेक माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय असा वाटलं... अहो आश्चर्य.. तो चक्क मराठीत बोलत होतो.. टांग्यातुन चलण्याशी अजिजि करत होता... मीही निमुटपणे त्याच्यामागोमाग चालु लागलो....
आणि आम्ही टांगा स्थानकात पोहोचलो... तिथे तर टांगा गाडिला सिंह बांधले होते... सिंह ??? तो टांगा होता का सिंगा...
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
मी मुकाट्याने टांग्यात कि सिंग्यात मागे बसलो .. मालकाने सिंहाचे दोर आवळले.... आणि जोरात डरकाळी फ़ोडतं सिंह धावायला लागला... जोरात... खुप जोरात...
प्रचंड जोरात... प्रचंड प्रचंड जोरात...
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
आणि तो सिंह पंख पसरवुन उडायला लागला... सिंहाला पंख ??? कसं शक्य आहे ??? उडणारा सिंह ???
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
घाबरुन त्या टांगाचालकाच्या खांद्यावर हात ठेवला.. त्याने गुरगुरत मागे बघितले... तो अर्धा असा... आणि अर्धा तसा चा चेहरा सिंहाचा झाला होता... आणि तो माझ्यावरच गुरगुरत होता...
मी प्रचंड घाबरलो... दरदरुन घाम फ़ुटला... डोळे गच्च मिटले आणि.. मी टांग्यातुन उडी मारली....
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
थोड्याच वेळात मी तरंगायला लागलो... मी पॅराशुटमुळे तरंगत होतो... तरंगत तरंगत येता येता... अचानक.. मी गोल्ड्न गेट ब्रिजवर उतरलो.. ब्रिजवर म्हणजे... ब्रिजच्या वरच्या टोकावर...
जोराचा वारा सुटलेला... प्रचंड थंडी... खाली अथांग प्रशांत महासागर.... "आसमान से टपके और खजुर पे अटके" अशी काहीशी माझी अवस्था...
तेवढ्यात खाली राम दिसला.. राम.,. माझा मित्र... तो मला जोरात आवाज देत होता पण मला काही त्याचा आवाज येत नव्हता... अणि माझा भ्रमणध्वनी खणाणला... फ़ोन ??? इथे कोणाचा आला ??? रामचाच होता... तो म्हणत होता.. घसरगुंडीसारखा ये खाली.. मी आहेच...
गोल्ड्न गेट ब्रिजवरुन घसरगुंडीसारख खाली... ??? काहीही....
परत एकदा डोळे मिटले... आणि घसरलो...
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
सहीसलामत... ब्रिजवर घसरलो.. डोळे उघडुन बघतो तर काय... समोर अटलजी.... साक्षात अटलजी !!! आणि त्यांच्यामागे अथांग जनसमुदाय... कैक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत होते... साक्षात अटलजी !!! त्यांना साष्टांग दंडवत घालुन मी पण त्यात सामील झालो...
अटलजी आगे बढो... हम तुम्हारे साथ है....
अब की बारी ... अटलबिहारी.....
अटलजी.... जिंदाबाद !!!
अटलजी.... जिंदाबाद !!!
अटलजी.... जिंदाबाद !!!
................ ................................ .............................. ...................................
मिलिंद मला झोपेतुन उठ्वत होता... जिंदाबाद.. जिंदाबाद... असं काय करतोय असं विचारतं होता...
काही कळत नव्हत काय होत होतं ... माझ काही खरं नाही एवढ मात्र नक्की होतं.... सारचं अतर्क्य...
~~~ मोCoool...
Friday, October 29, 2010
Dinner with Anand ….. A lifetime Treasure!!!
It was a lifetime experience to share a dinner table with Anand. I am really proud of our Big Boss. The way he work, the way he address is really nice and his journey from first generation entrepreneur to whatever he is now is simply phenomenal. He is our ROLE MODEL!!! He pat on our back and appreciated the work we are doing. It really gave an extra boost to work more and harder.
Thanks Anand !!!
Sunday, August 29, 2010
जॉर्ज ( एक झुंजार वादळ ते एकाकी निशब्द ...)
खरचं हि नियतिची क्रुर थट्टा आहे की ज्या जॉर्ज च्या एका आवाजावर संपूर्ण मुंबई स्तब्ध व्ह्यायची, ज्याला Gient Killer संबोधले जायचे त्याचे आज जे अतोनात हाल चालु आहेत ते बघवत नाहीत. ना त्यांना स्वताःचा आवाज आहे ना त्यांचा आवाज ऐकुन घ्यायला कोणी तयार आहे. खरचं आमचा जॉर्ज असा नव्ह्ता....
जॉर्ज एक वादळ होता... एक लढवय्या नेता होता... Pepsi, Coke सारख्या बहुराष्टिय कंपन्यांना भारतातुन पळता भुई करुन सोडणारा... एक सर्वसामान्यांचा नेता... जॉर्ज फ़र्नांडिस.....
जेपी अर्थात जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादाचा सच्चा पुरस्कर्ता आणि प्रचारक.जॉर्जच संपूर्ण आयुष्य म्हणजे एका थरारक सिनेमापेक्षा काही कमी थरारक नव्हते.
७० च्या दशकात खरया अर्थाने जॉर्ज प्रकाशात आला तो युनियन नेता म्हणुन. त्याच्या नेत्रुत्वाने मुंबईतील कामगार वर्गाला जबरदस्त आवाज दिला होता. जणु काही आख्या मुंबईवर जॉर्जचच वर्चस्व आहे. स. का पाटिल सारख्या मुरलेल्या राजकारण्याला केवळ जनपाठिंब्यावर निवडणुकीत पाडणारा जॉर्ज एकमेव. ’रेल रोको’, ’रास्ता रोको’ च्या माध्यमातुन सतत कामगारांचे प्रश्न मांडणारा... प्रसंगी त्यासाठी लाठी खाणारा...
त्यांच्या कारकिर्दीतला आणखी एक मानाचा तुरा म्हणजे कोकण रेल्वे प्रकल्प. ८९-९० च्या त्यांच्या रेल्वे मंत्रिपदाच्या कारकिर्दीत या प्रकल्पल खरया अर्थाने गती मिळाली. पण सरकार न टिकल्यामुळे त्यांची कारकिर्द अल्पजिवि ठरली.
त्यांनी भाजपा सारख्या पक्षाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापणे हे त्यांच्या समर्थकांनाच काय पण त्यांच्या विरोधकांनाही पचनी पडणारे नव्ह्ते. परंतु तो एक निव्व्ळ राजकीय समझोता होता. ती काही विचारसरणीशी फ़ारकत नव्हती तर जनतेची सेवा ही सरकार मध्ये राहुनच करता येते हा विचार त्यामागे होता. म्हणुनच NDA च निमंत्रक पद त्यानी अतिशय उत्तमपणे हाताळले.
No doubt He was Most Popular Defense Minister. "Operation-Vijay" च्या वेळी आतिशय दुर्गम अश्या टायगर हिल्स आणि द्रास भागात स्वतः जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी जाणारा एकमेव संरक्षणमंत्री !!! अर्थात त्यांच्या संरक्षणमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. पण त्यात त्यांचा व्यक्तिशः काही संबंध नव्हता. ज्याच्या घराला security gaurd आणि दरवाजा पण नाही त्यावर झालेले आरोप हा ही एक राजकारणाचा भाग होता.
आज त्यांची अवस्था पाहुन मन विषण्ण होते. एका हाडाच्या नेत्याचा आयुष्याचा अखेरचा काळ असा जावा हे विदारक आहे.
आमच्या मनात मात्र कायम राहील तो...
आयु्ष्यभर खादी वापरणारा... जनसामान्यांच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारा... खरा नेता..... जॉर्ज फ़र्नांडिस
~~~ मोCoool...
Monday, August 16, 2010
स्वातंत्र्यदिन... परदेशातला ......
परदेशात अनुभवलेला पहिला स्वातंत्र्यदिन.
स्वातंत्र्यदिन ... प्रत्येक देशातील नागरिकांसाठी सर्वाधिक अभिमानाचा दिवस.
ह्या वेळेस मी माझया जन्मभूमिपसून दूर येथे आमदेशि अर्थात अमेरीकेत होतो. खरच... परदेशात राहून स्वांतंत्र्यदिन साजरा करायचा अनुभव काही औरच..
येथील IOA या organisation ने हा उत्सव आयोजित केला होता. अगदी सारे वातावरण हिंदुस्तानमय झाले होते.
अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम... सुबक नियोजन आणि अवघ्या भारतीयांचा ओसांडता उत्साह !!!
सोहोळ्याची सुरूवात झाली ती शोभायात्रेने. येथील महापौर, काउन्सिल सदस्य हे ओपन टॉप मेर्सिडेझ मध्ये बसून सगळ्याना अभिवादन करून जात होते। सगळ्याना स्वांतंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत होते. परदेशी माणसाने त्यांच्याच देशात असलेल्या मला माझया स्वातंत्र्यदीनाच्या शुभेच्छा देणे..... काहीतरी वाटत होते. वेगळेच
एक एक गाडी पूढे सरकत होती प्रत्येक गाडीवर भारतीय तिरंगा आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकत होता... आणि शोभायात्रेच्या मुख्य आकर्षणाला सुरूवात झाली
आपल्या प्रजासत्ताकदीनप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांच्या झांकी होत्या भारतातल्या प्रत्येक राज्याचे \रथ त्या त्या राज्याची संस्कृती पेश करत होते. सुरूवात झळी ती बे एरिया तेलगु मंडळाच्या चित्ररथाने. गेरुने सरवलेली झोपडी विहिरीवार पाणी भरणारी ताई आणि शेतात राखन करणारा शेतकरी सोबत लोकगीताची धून असा ग्रामीण बाज होता. त्या पाठोपाठ आले हिंदू स्वयंसेवक संघाचे पथक. शिस्तबद्ध हालचाली त्याला ड्रम ची साथ. जणू काही सैनिकी बॅंडच. त्यानंतर आले राजस्थानचे पथक, भलामोठा फेटा घातलेले ८-१० राजस्थानी लोक. सब कुछ राजस्थान
त्यानंतर आला महाराष्ट्र मंडळाचा चित्ररथ. माझ्या महाराष्ट्राचा चित्ररथ !!!
पुणेरी ढोलचा दणका पाय थिरकवत होता.. खरच लेझीम असायला हव्या होत्या. पुणेरी पगडी, नउवार साड्यांचा थाट आणि फडकणारा जरिपटका !!! एकूणच सारा अस्सल मराठी मामला होता. परंतु तरीही पथकातील लोकांची तुरळक उपस्थिती खटकत होती.
त्या पाठोपाठ आले उत्तर प्रदेश आणि कर्नाटक चे पथक. कन्नड लोकांनी 'नृत्यमीलन' सादर केले होते तर लखनौ च्या लोकांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांच्या प्रतिकृती सादर केल्या होत्या.
काश्मीर आणि केरळ च्या पथकाने शोभायात्रेची सांगता झाली.
त्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रम आणि खाद्ययात्रेने पूर्ण महोत्सवाची सांगता झाली
एक coloureful experience !!! .............
राहून राहून एक प्रश्न मात्र सतावत राहिला......
तिकडे भारतात आपण परराज्यातील सण उत्सव साजरे करायला विरोध करतो आणि परदेशात राहून आपल्या मायदेशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो....
खरच विचार करण्यासारखे आहे....
~~~ मोCoool...
Monday, June 7, 2010
BART एक AUTOMATIC अनुभव...
BART म्हणजे Bay Area Rapid Tranport system. सॅनफ्रांसिस्को खाडी भागातली रेल्वेव्यवस्था .( हुश्.... किती अवघड आहे ना...) अहो थोडक्यात काय तर आपल्या दिल्ली मेट्रो ची मोठी जुळी बहीण... (हमम्म... आता कसं सोपे सोपे...) तर BART हा एक complete ऑटोमॅटिक अनुभव. अगदी Entry पासून Exit पर्यंत ...
तिकीट मिळण्यासाठी ऑटोमॅटिक यंत्रे जे पैसे घेतात आणि तिकिटे छापून देतात....
छापलेले तिकीट स्वाइप केले के स्टेशन मधे entry मिळते automatic ....
स्टेशनवर जाण्यासाठी सरकते जिने ... म्हणजे ऑटोमॅटिक च.. फक्त पायरीवर उभे राहा पोचालात्च वर (वर म्हणजे पहिल्या मजल्यावार हो.. एकदूम वर.. नाही काही.. :) )
ट्रेन चे दरवाजे उघडतात ऑटोमॅटिक...
बंद होतात ऑटोमॅटिक.....
दरवाजे बंद होण्यासाठी वॉर्निंगची अनाउन्स्मेंटही ऑटोमॅटिक...
ज्या स्टेशनवर उतरू त्याप्रमाणे पैसे कापले जातात ते पण ऑटोमॅटिक...
नशीब ट्रेन नाही चालत ऑटोमॅटिक ...
सगळे काही नविन असले तरी काही गोष्टी मात्र अगदी आपल्यासारख्या आहेत. आपल्यासारख्याम्हणण्याची दोन कारणे. १. आमच्यावर पु.ल.नचा प्रभाव आहे. २. आपल्यासारखे अस म्हण्ट्ले की उगाच मायभुमिपासुन दुर नसल्यची भावना सुखावुन जाते.
तर आपल्यासारख्या असलेल्या काही गोष्टी
१.इथेही रेल्वे स्थानकात भिकारी असतात. भले ते वेशभुषेवरुन भिकारी वाटत नसले तरी ते भिकारीच असतात्.
२ इथेही सिग्नल नाही मिळाला कि ट्रेन क़ुठेही थांबते.
३. आणि मुख्य म्हणजे इथे स्टेशन्स पण अगदी आपल्यासारखे वरचा फाटा - खालचा फाटा सारखी... (Hayward... South Hayward... ;))
पहिल्या दिवशी सारेच काही नवीन नवीन त्यामुळे प्रत्येत ठिकाणी ठेचाळलो. सगळ्यात शेवटी धन्यवाद ची announcement झाली ती पण ऑटोमॅटिकच....
मी पण मनातल्या मनात ऑटोमॅटिक "THANKS !!!" म्हणून ऑफीसकडे कूच केले...
~~~ मोCoool...
Saturday, May 8, 2010
आयुष्य म्हणजे ...
आयुष्य म्हणजे आंबे फणस आणि फणसासारखी नाती...
आयुष्य म्हणजे पहिल्या पावसाने सुगंधित होणारी माती...
आयुष्य म्हणजे स्वप्नरंजनात रमणे ...
आयुष्य म्हणजे स्वप्न सत्यात आणायला झुंजणे ...
आयुष्य म्हणजे डोंबार्याचा खेळ
कायम जुळवावा लागे भविष्य आणि वर्तमनाचा मेळ ...
~~~ मोCoool...
Wednesday, March 24, 2010
वर्ष नवे हर्ष नवे ... नवे वर्ष नवी सुरुवात !!!
आता काही नूतन वर्षाचे संकल्प... आता तुम्ही म्हणाल " अरे संकल्प पहिल्या दिवशी करायचा असतो. एवढ्या उशिरा नव्हे." पण मी काय म्हणतो पहिल्या दिवशी संकल्प करून दुसऱ्या दिवशी विसरण्यात काय अर्थ आहे. परत " नव्याचे नऊ दिवस " हे वरतून आहेच . अरेच्चा आज तर नववाच दिवस आहे. (रामनवमी ...) क्या बात है.. म्हणजे आता संकल्पांचा विसर पडण्याची शक्यता नाही :)
तर नूतन वर्षाचे काही संकल्प असे...
१. कळसुबाई शिखर सर करायचे आणि किल्लेभ्रमंत्तीचे आणखी एक दशक...
२. बाबा आमटेंच्या आनंदवनात जाऊन श्रमसंस्कार शिबिरात भाग घ्यायचा ...
३. विठ्ठलाच्या वारीबरोबर पुणे ते सासवड पायी जायचे (ग्यानबा तुकाराम ) ...
४. पन्हाळा ते विशाळगड हा गुरुपौर्णिमेला होणारा ट्रेक पूर्ण करायचा...
५. एका दुर्गम गावातल्या शाळेत जाऊन पुस्तके द्यायची...
६. राजा शिवछत्रपती पुस्तकाची नवीन आवृत्ती वाचून काढायची...
अर्थात हे सर्वच संकल्प पूर्ण नाही होणार.. पण तरीही त्या स्वप्नरंजनात काही सुखाचे क्षण तर मिळाले... :)
~~~ मोCoool...
Saturday, March 6, 2010
मोहीम- किल्ले मृगगड
नववर्षाला (२००९) ला सुरुवात झाली. पहिली मोहीम ठरली मोहीम - किल्ले मृगगड. गड मीच सुचवला आणि सर्वांनी मान्यता दिली. बऱ्याच चाळण्या मारून शेवटी ५ जण उरले. अभिच्या मरीना उर्फ मारिया (!) ने जायचे ठरले. सकाळी ६.०० ला एरंडवणा सोडले. आकुर्डी रेल्वेस्टेशन वर चहा पिऊन, विनोद ला उचलून आम्ही पंचमहाभूते (अभी, राम, विनोद, अमर आणि मी) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोलीकडे प्रस्थान केले. खोपोलीहून पाली रस्त्याला लागल्यावर लगेचच सकाळच्या ब्रेकफास्टसाठी (अरे ब्रेकफास्ट सकाळीच करतात. असो.. त्यावर वेगळा पोस्ट नंतर कधीतरी... ) थांबलो. पोहे २० रुपये बाबत विचारले असता मालकाकडून " सध्या महागाई वाढली आहे साहेब!!! " हा सल्ला दानावर दक्षिणा सारखा ब्रेकफास्ट वर फुकट मिळाला.
तेथेच माननीय विनोदराव भोईटे यांचा अखिल (?) गडकरी मंडळातफे श्रीफळ, पुष्पहार आणि हातरुमाल देऊन जाहीर नागरी (?) सत्कार करण्यात आला. (मोलाचे सहकार्य--अमर गायकवाड, मंडळ अमरचे सहर्ष आभारी आहे !!!). थोडक्यात बऱ्याच दिवसांनी मोहिमेवर येण्याची कृपा केल्याबद्दल हा सत्कार होत होता. (हा बाकीच्यांना इशारा आहे.)
हिरवी झाडे, छोटी छोटी गावे मागे टाकत टाकत एका अवघड वळणावर थबकलो. तेथे एक दुचाकीस्वार रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमूळे घसरून पडला होता. आम्ही तत्परतेने आमच्याकडील प्रथमोपचार पेटी वापरून प्रथमोपचार केले आणि जेथे रस्त्यावर ऑईल सांडले होते तेथे माती टाकून पुढील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना सुखावून गेली.
वळणावळणाचा रस्ता, दुतर्फा हिरवी झाडे, उंबरी, सेमडी, नाणोसे,परळी हि गावे मागे टाकत जांभूळपाडा गाव गाठले (हेच ते जांभूळपाडा गाव जे १९९७-९८ च्या सुमारास प्रचंड पुरात अक्षरशः वाहून गेले होते). जांभूळपाड्याला खोपोली-पाली रस्ता सोडून गाडी भेलीव च्या दिशेने गाडी वळवली. दिशादर्शक पाट्यांचा आभाव आणि कोरे मैलाचे दगड त्रास देत होते. काका , तात्या, बाळ्या, नाम्या ला विचारत विचारत भेलीव गावात पोहोचलो. भेलीव गावात चारचाकी न्यायाची असल्यास नदीपात्रातून न्यावी लागणार हे लक्षात आल्यावर काही अंतर अलीकडेच सावलीत गाडी लावली आणि मोहिमेला सुरवात झाली.
भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात केली. रस्ता समजत होता पण अंदाज येत नव्हता. तेवढ्यात 'पांडुरंग' अगदी देवासारखा धावून आला. (पांडुरंग हा भेलीव मधला एक मेंढपाळ जो नंतर आमचा वाटाड्या झाला) पांडुरंगसाठी भेलीवचा किल्ला म्हणजे काही नवीन गोष्ट नव्हती. त्याच्यासाठी तर ते रोजचेच काम होते. तो वाट दाखवायला तयार झाला आणि मुख्यत्वे अभिने सुटकेचा निश्वास टाकला.
पहिल्या टप्प्याची वाट पायवाटेची काहीशी सोपी आणि डोंगराच्या कातळाला समांतर अशी होती. थोडे चढण घेऊन आम्ही एका गुहेपाशी थांबलो. एक माणूस बसून जो शकेल अशी अंधारी गुहा होती ती. अमरची जिज्ञासू वृत्ती त्याला त्या गुहेत घेऊन गेली. मोबाईलच्या मिणमिणत्या प्रकाशात संशोधन करून अमर, अभी आणि विनोद असे तीन वीर परतले. पण हाती काहीच लागले नाही. एक धडा मिळाला. बरोबर कायम एक विजेरी असावी. (पुढील मोहिमेत यावर जरूर अंमल केला जाईल !!!). पुढे एका घळईतून वर चढलो. घळईने थोडी परीक्षा पहिली पण it's OK म्हणत पुढ गेलो. दुसऱ्या मार्गाने तेथे पोहोचलेल्या अमर ने एक good news दिली। काय ? " जोरदार वाराआहे... समोर उंच उभा कातळ आहे... त्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत... आणि त्या चढून आपल्याला जायचे आहे.... " बास्स॥ झालं... रामसह सर्वांनी मला शिव्या (त्या येथे टाकत नाही ;) ) दिल्या आणि "हाच किल्ला सापडला होता का?" सुनावले। थोडा मीहि बिचकलो. पण परत पांडुरंग धावून आला. पांडुरंगाने तो कातळ कडा अवघ्या ५ मिनिटात सर केला आणि मग थोडा धीर आला. थोडा वेळ राम ला पटवून, राजी करून ती तीन टप्प्यातली कातळ चढाई चढण्यास सुरुवात केली. जवळपास चाळीस एक फुटाच्या त्या कातळात मधेच काही पायऱ्या लुप्त होत होत्या. वारा प्रचंड वेगाने वाहत होता. तरीही सर्वांनी १५ मिनिटात ती कातळ चढाई यशस्वरीत्या पूर्ण केली आणि आजवरच्या किल्लेभ्रमंती मधील सर्वात अवघड चढाई म्हणून प्रशस्तीपत्रकहि देऊन टाकले. तेथे पांडुरंगाचे आभार मानून त्याला निरोप दिला. आमच्याकडची दोन सफरचंद दिल्यावर त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद केवळ अवर्णनीय!!!.
किल्ल्याच्या वरच्या भागात बघण्यासारखे फार काही नाही. पाण्याच्या टाक्यांचे काही अवशेष बघायला मिळतात. किल्ल्यावरून चारही दिशांचा परिसर उत्तमरीत्या न्याहाळता येतो. पूर्वेला दूरवर सरसगड दिसतो. मृगगडावरून समोर एक उंच सुळका दिसतो. अजून एक नमूद करण्यासाखी गोष्ट म्हणजे हा किल्ला प्रदूषण विरहित आहे. हि गोष्ट मनाला अत्यंत सुखावून गेली आणि " किल्ला जितका दुर्गम तितका तो स्वछ" या आमच्या प्रमेयाला सिद्धता मिळाली :)
किल्ल्यावर जेवण आणि घटकाभर विश्रांती घेऊन ( अर्थात राम कातळाच्या भीतीने तितकासा जेवला नाही) कातळ उतरायला सुरुवात केली. अमरच्या मार्गदर्शनाखाली रामने उत्तमरीत्या कातळ उतरण पूर्ण केली आणि अभिने तत्परतेने ते क्षण कॅमेरात कैद केले.( उगाच नाही नेत आम्ही त्याला;) ) कातळ उतरल्यावर उजव्या हाताला एक गुहा दिसताच अमरची संशोधक वृत्ती पुन्हा जागी झाली आणि अमर-विनोद-अभि खोदलेल्या पायऱ्यांवरून कसरत करत गुहा बघून आले. उतरताना फारसा काही त्रास झाला नाही आणि ४० मिनिटात भेलीव गाव गाठले. थोडा वेळ असल्याने जवळच असलेल्या घोटावडे धरणावर जाऊ असे रामने सुचवले. ३.३० ला भेलीव ला निरोप देऊन जांभूळपाड्याकडे गाडी वळवली. विचारत विचारत खोपोली-पाली रस्त्यावरील परळी गावापासून ४ किलोमीटर असणाऱ्या घोटावडे धरणापाशी पोहोचलो (एक उत्तम ठिकाण सुचवल्याबद्दल रामचे आभार !!! ) धरणाच्या काठावर बसून समोरील खळाळते पाणी बघून शीण कुठल्या कुठे गेला. धरणाच्या पाण्यावार दगडाच्या खेळाचा एक अंकहि झाला. (आणि त्यात अभि was undisputed WINNER :) )
लवकर अंधार पडायचा विचार करून ५.०० ला परतीच्या प्रवासा लागलो. आणि पुढील मोहिमाचे नियोजन आणि स्वप्नरंजनालाही सुरुवात झाली.
#######################################
हे लक्षात ठेवा !!!
#######################################
१. वाटाड्या बरोबर असू द्या. भेलीव गावात तो नक्की मिळेल.
२. गडावर पाणी नाही. पाण्याचा साठा बरोबर असू द्या.
३. बरोबर विजेरी असणे उत्तम
४. गडावर राहण्यास सोय नाही त्यामुळे हि मोहीम एक दिवसाचीच असावी.
5. आणि येता येता घोटावडे धरणाला नक्की जा !!!
~~~ मोCoool...
V.R.S.(वाळवंटात राहणे सोडणे !!! )
आयटी मधून V.R.S. घेणारा पहिला माणूस होणार...
दिवसरात्र अन रात्रंदिवस माझा ऑफिसमध्ये राबता...
त्या पलीकडच आयुष्य मात्र सोयीस्कररीत्या विसरतोय...
जवळच्या मित्राचा वाढदिवस मात्र डोक्यातून निघून जातोय...
आजचा drop , उद्याचा milestone, परवाच Release
मारतो कधी कधी मित्र मंडळींबरोबर फेरफटका...
अन उरलेल्या नावडत्या भाजीसमोर मी उभा अभिमान्युसारखा...
म्हणतो गावाकडं जाईन करून सगळी शस्त्र म्यान...
पण तेथे माझ्या मनाचा खुद्द मीच मालक असीन...
मीही तितक्याच तत्परतेने त्याला वर्तमानात आणतो...
परंतु तरीही लढण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन सज्जलेला
भविष्यातील आनंदकण वेचण्यासाठी आसुसलेला
आणि म्हणूनच V.R.S.च्या मृगजळाकडे पाठ फिरवून सदैव पुढे चाललेला...
~~~ मोCoool...
Tuesday, March 2, 2010
आमचे पाव-शतक आणि रक्तदानाच दशक !!!
या वर्षीही नेहमीप्रमाणे रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. यंदा दहाव्यांदा रक्तदान केलं. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. आणि याच भावनेतून केलेलं रक्तदान एक वेगळाच समाधान देतं. आणि ह्या वेळेचं वैशिष्ट म्हणजे वाढदिवसाची भेट म्हणून पुणेरी अस्मितेचे प्रतिक असलेली 'पुणेरी पगडी' मुरुडकर झेन्डेवाल्यांकडून घेतली.
मागे वळून पाहताना आठवणीचा चित्रपट सरसर डोळ्यासमोरून सरकत जातो.
आजवरच्या आयुष्यातल्या काही ठळक नोंदी. :-
१. बालवाडीत कविता वाचनात मिळवलेले बक्षीस( ते प्रशस्तीपत्रक आजही माझ्या जवळ आहे )
२. बाबांनी माझ्यासाठी सायकलला बसवलेले छोटे सिट
३. दुसरीत असताना दोनशे मुलांसमोर केलेलं १५ ऑगस्ट चा भाषणं
४. चवथीत असताना सहलीकारता नेलेले आणि नंतर हरवलेले ५० रुपये... सहलीला न जाण्याची मिळालेली शिक्षा... आणि त्यातून मिळालेला वस्तू आणि पैसे सांभाळण्याचा आणि त्याची किंमत समजण्याचा धडा...
५. 'नटसम्राट' हे काय आहे हे कळत नसणाऱ्या वयात fancy ड्रेस स्पर्धेत उभा केला "नटसम्राट"
६. बाबांचा विरोध डावलून आईने आणून दिलेली पतंग, मांजा, भिरभिरे आणि दिवाळीच्या दोन दिवसआधी आणून दिलेले फटाके.
७. दहाव्या वाढदिवसाला घेतलेली सायकल
८. कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी आयोजित बालकवी संमेलनात सदर केलेली कविता
९. एका ओवर मध्ये २२ runs हवे असताना अनपेक्षितरित्या मी केलेली तुफान फटकेबाजी आणि विजयानंतर माझ्या टीमने मला डोक्यावर घेऊन केलेलं जल्लोष
१०. बाराव्या वर्षी रायगड सर केल्याचा थरारक अनुभव.
११. चित्रकलेच्या परीक्षांमुळे चित्रकलेशी आलेला संबंध... एक colourful experience !!!
१२. तेराव्या वर्षी बाबांनी दसऱ्याला गाडीची पूजा करता करता अचानक पहिल्यांदा गाडी चालवायला दिलेली संधी
१३. सलग तीन वेळा आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत मिळवलेल वैयक्तिक अभिनयाचे बक्षीस
१४. आठवीत आणि नंतर engineering ला असताना अनुक्रमे प्रशांत दामलेची आणि अशोक सराफ यांची घेतलेली मुलाखत.
१५. नववीत असताना ऐकलेलं जॉर्जे फर्नांडीस यांचे भाषणं
१६. दहावीच्या महत्वाच्या वर्षी माझा आहार, आजार आणि अभ्यास सांभाळणारी आई आणि अडल्यावेळी कायम माझ्या मागे धावणारे अगदी नादुरुस्त सायकल दुरुस्त करून क्लास पर्यंत आणून देणारे बाबा
१७. दहावीला कमी मार्क्स मिळाले म्हणून रडणारा मी आणि एवढे मार्क्स मिळूनही रडणाऱ्या माझ्याकडे आश्चर्याने बघणारे आई बाबा
१८. दहावीच्या सुट्टीत भोंसला मिलिटरी स्कूल मध्ये घालवलेला एक महिना... एक great learning experience आणि आयुष्याकडे बघण्याची मिळालेली दृष्टी
१९ . बारावीची मार्कशीट हातात पडल्यावर chemistry ले ९६ मार्क बघून "ही माझीच मार्कशीट आहे का?" असे विचारणारा मी आणि बारावीच्या यशाबद्दल आख्या सोसायटीमध्ये अभिमानाने मिरवणारी आई आणि खास प्रसंगासाठी सुप्रसिद्ध "पांडे मिठाई"चे पेढे आणायला धावलेले बाबा ...
२०. बारावीनंतरच्या सुट्टीत बाबांच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनुभवलेले एक नवीन वेगळे काहीसे व्यावहारिक जग
२१. engineering कॉलेजला कायम मार्गदर्शन करणारे ठिगळे सर
२२. first क्लास engineer झाल्यानंतर पदवीदान समारंभात मिळालेली पदवी आणि अभिमानाने काढलेला फोटो
२३. माझ्या नोकरी निमित्त गाव सोडण्याच्या निर्णयाला तात्काळ होकार देणारे आई-बाबा
२४. कात्रज- सिंहगड मोहिमेपूर्वी झालेली बाबासाहेब पुरंदरे यांची संस्मरणीय भेट (बाबासाहेब हे आमचे दैवत आहेत)
२५. कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले काका, काकू, दादा, ताई, वाहिनी आणि सर्व नातेवाईक आणि आजवर मला लाभलेले शाळा , कॉलेज, engineering कॉलेज आणि कंपनीतले मित्र-मैत्रिणी आणि माझं नाशिक आणि आता गेल्या चार वर्षापासून माझे पुणे .....
आता फार हलकं हलकं वाटतंय....
~~~ मोCoool...
स - सचोटी, चि- चिकाटी, न - नम्रता
तुझी २०० ची इंनिंग म्हणजे केवळ अप्रतिम !!! त्यात दिसली ती एकाग्रता, dedication, fitness, आणि आमचा ९६-९७ सालातला बेधडक, आक्रमक फटके मारणारा सचिन. त्यानंतर match presentation मारलेला straight Drive चा चौकार :) तर अफलातूनच !!! . आता काही कर्मदरिद्री लोक (हे दारिद्य फक्त बुद्धीशी संबंधित आहे)
तुझी Bradman शी तुलना करून कोण सर्वोत्कृष्ट याचे चार्वित्च्रण बसतील . पण आम्ही एवढच सांगू Dont compare Oranges with Leamons . आम्ही Bradman पहिला नाही आम्ही सचिन पहिला. आमच्या साठी आज हाच सर्वोत्कृष्ट !!! आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि आम्ही सचिन ला खेळताना बघितला !!!
तू राह है... और राही भी ....
तू जान है .... और जहान भी .....
तू सच है ........ और सचिन भी !!!!!
~~~ मोCoool...
Monday, February 22, 2010
माझी जन्मभूमी...
ही आहे कथा माझ्या जन्मभूमीची
जुनेच गाव पण पालटलेल्या त्याच्या रूपाची...
रस्ते झाले रुंद आले नीऔन साइन
द्राक्षाबरोबर फेमस झाली फेसळाती वाइन
वाडे पडले मौल आले पुसल्या जुन्या खुणा
जुने लोक जुन्या खुणा आठवतात पून्हा पून्हा
तरी नाही बदलला शहराचा स्थायीभाव
टोपीवाल्या चिवडेवाल्या काकांचा प्रेमभाव
अशीच आहे माझ्या गावाची कहाणी
परंपरा जोपासात आणले बदलाचे पाणी
खर तर बदल हीच अबाधित गोष्ट असते
परिस्थितीनुरूप बदलण्याची मनुष्याची मानसिकता असते
अनुभवत होतो आधुनिकतेकडचि वाटचाल
बदललेल्यागावाच्या रूपड्याला माझा मनोमन सलाम !!!
~~~ मोCoool...
