नुकताच खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणुकीचा निकाल लागला.
निकाल अनपेक्षित होता. भीमराव तापकीर् निवडून आले. पण ही बदलची नांदी आहे का.. ही नांदी तर आहे.. कारण हा एका पोटनिवडणूकीतला नसुन एका प्रव्रुत्तिच्या विरोधात जनतेने दिलेले उत्तर आहे. ह्या निकालाला बरेच कंगोरे आहेत.
राष्ट्रवादीने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती. राज्यातले १५-१६ आमदार मतदार संघात तैनात होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदार संघात येतो. आणि कदाचित बारामतीमधे केवळ खडकवासला मतदार संघ हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे राष्ट्रावादीचा आमदार नाही. त्यामुळे ह्या मतदारसंघ घेऊन संपूर्ण बारामती मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा डाव होता. अजित दादांसाठीसुध्दा ही निवडणूक प्रतिष्ठेची होती किंबहुना त्यांनी ती केली होती. पण निकाल उलटा लागला.. आता तर बरेचसे लोक हा वांजळे यांचा पराभव नसून अजित दादंचा आहे असे म्हणत आहेत. ह्या निवडणुकीत बरेच फासे अजित दादांच्या विरोधात गेले. हर्षदा वांजळे ह्यांच्या उमेदवारीवरुनही राष्ट्रवादित अंतर्गत धुसफूस होती. त्याचाही परिणाम ह्या निवडणुकीत दिसला अस दिसतय.
भाजपच्या दृष्टीने तर ही लॉटरी आहे.. कारण निकालच्या दिवसापर्यंत सुद्धा बरेचसे भाजपचे लोक निकालाबाबत साशंक होते. निकालच्या दिवशी सुद्धा युतीचे कोणीही मोठे नेते मातमॉजणी केंद्राजवळ फिरकले नव्हते. पण शिवशक्ति आणि भीमशक्ती एकत्र आल्यावर हा पहिला विजय आहे. ATM मधून पहिला विजय बाहेर पडलाय. अण्णा हजारे यांनी तयार केलेले भ्रष्टाचारविरोधी वातावरण आणि मनसे ने तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय ह्या दोन्ही गोष्टी भाजपच्या पथ्यात पडणार्या होत्या. गेल्या अनेक दिवसापासून पुण्याच्या जनतेत असलेल्या असंतोषाचही काही प्रमाणात राष्ट्रवाडीला फटका बसलाय.अर्थात ह्या एका निवडणुकीमुळे जनमत बदलले आहे, आणि ह्याचा प्रभाव येऊ घातलेल्या पुणे- आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणि विधानसभेवर होईल असे नाही. कारण ही केवळ एक पोटनिवडणूक होती परंतु ही नक्कीच बदलाची नांदी आहे. पण ह्यात आणि एक मेख आहे.. आजचा निकाल जरी भाजपच्या बाजूने लागला असला तरी तो आपल्या बाजूने पूर्णपणे वळवणे आणि टिकवणे हे खूप अवघड काम आहे… ह्या सार्या वातावरणाचा कसा फायदा उचलते हे रंजक आहे आणि तिथे ATMकमी पडेल असे दिसतय…
पण तरीही सर्वात शेवटी.. आज ची खडकवासला निवडणूक म्हणजे.. राजकीय टगेगिरीला आणि गुंडगिरीला जनतेने दिलेले जोरदार उत्तर आहे अस म्हणायला हरकत नाही. !!! जय लोकशाही !!!
~~~ मोCoool...