Friday, March 29, 2019

संतोषगड

'जीव संतोषणारा' संतोषगड !!!

बऱ्याच दिवसांनी जमून आलेली मोहीम ... किल्ले संतोषगड.
फलटण पासून २० किमी आणि पुण्यापासून १२० किमीवर असलेला संतोषगडाची मोहीम 'यावेळेस' मात्र फत्ते झाली. या वेळेस अशासाठी की, २०१४ साली एस टी च्या कृपेने फलटण बस स्थानकात ताथावडे बस चे दर्शन च दुर्लभ झाले. आणि खाजगी वाहनाचा वापर टाळायचा या नियमामुळे संतोषगडाची मोहीम फलटण चे राम मंदिर, निंबाळकर वाडा पाहून आटोपती घ्यावी लागली.

या वेळेस मात्र स्वतःचे वाहन असल्याने ती अडचण नव्हती. किल्ल्याची प्राथमिक माहिती घेऊन सकाळी ६. १५ ला आंबेगाव, कात्रज कोंढवा रस्त्यामार्गे पुणे सोडलं.  बऱ्याच दिवसांनी जुने 'गडकरी' मित्र एकत्र आल्यानं गप्पांचे विषय फटाफट बदलत होते.  गप्पांचे रूप चर्चासत्रात कधी बदलले कुणालाच कळले  नाही.  आयफोन नामक महागड्या फोनच्या उपयुक्तते (?) पासून ते सध्याच्या राजकीय परिस्थिती पर्यंत चर्चांचे विषय बोपदेव घाटातल्या वळणांसारखे बदलत होते.

सासवड च्या सुप्रसिद्ध अस्मिता वडेवाल्याचा पहिल्या घाण्याचा वडा पाव खाऊन गाडी फलटण च्या दिशेने वळवली. गड जसा नजरेच्या टप्प्यात आला तसं गडावरच्या अवशेषांबद्दल उत्सुकता वाढली. छोटेखानी तर दिसत होता पण तरीही वाढलेले वजन, वाढत ऊन आणि सातत्याचा अभाव यामुळे आम्ही या मोहिमेला 'अगदीच सोप्पा' या श्रेणीत टाकणार नव्हतो.

पहिल्या पायरी ला नमस्कार केला आणि ९. ५७ ला गड चढायला सुरवात केली. ऊन चांगलंच जाणवत होतं. पण बऱ्याच दिवसांनी गडकरी मैतर एकत्र आल्याने चढाई सुसह्य होत होती. गडाच्या पहिल्या टप्प्यात वळ्णावळणाची वाट आणि दर  २० पावलावर सातारा वनविभागाचा फलक ! वाट चुकायची अजिबात शक्यता नाही. पहिल्या टप्प्यातली चढण संपल्यावर एका झाडाखाली एक बाक ठेवलाय. काही क्षण बसून सगळ्या परिसराचा पॅनोरमा घेण्याचा मोह न झाला तरचं नवल !

पुढे एक मोठा पडक्या बुरुज आहे. त्यालाच लागून एक छोटा पडका दरवाजाही. जवळच एक सुंदर कमान दिसली. त्या कमानीतून दिसणारा गावातला रास्ता ... आहाहा ...  एक सुंदर फ्रेम. अगदी... 'ही वाट दूर जाते' टाईप .. जवळच एका झाडावर एका पक्षाने आमच्या कॅमेरा ला सुंदरशी पोझ देऊन कृतकृत्य केले. थोड्या वेळाने पक्षाची भीड चेपली. मग काय.. अगदी प्रॉपर फोटोसेशन झाले !

पुढच्या वळणावर भग्नावस्थेतील मोठा दरवाजा आपल्याला भेटतो.  आणि त्याची भग्नावस्था बघून वाईट वाटतं. दरवाजातील देवड्यांच्या खोल्या मात्र सुस्थितीत आहेत. बरं वाटलं ...

त्याच दरवाजाच्या साक्षीने बऱ्याच दिवसांनी (वर्षांनी) सह्याद्रीला पदस्पर्श करणाऱ्या अमरराजे यांचा मंडळाच्या वतीने मिळेल त्या गोष्टीने (हारतुरे हातरुमाल टोपी )जाहीर (!) सत्कार करण्यात आला. अर्थात मोहिमा पुन्हा सुरु करा हे आश्वासन घेऊन !
त्याचबरोबर प्रथमच मोहिमेला आपल्याबद्दल अभि राजे यांचाही त्याच (!) हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला.

गडाचा घेरा फार मोठा नाही. तटबंदी, बुरुज, धान्यकोठार इ. अवशेष बघितले . पण सगळ्यात आश्चर्य आहे ते म्हणजे इथलं टाक !! चिंचोळी  खाली उतरणारी ८-१० पायऱ्यांची वाट. आणि उतरल्यावर दिसत ते भलं मोठं टाकं.  सध्या हे टाकं  कोरडं आहे. पण त्या काळच्या गडबांधणी नियोजनाचा उत्तम नमुना ! सलाम !!! टाक्याची बांधणी , त्याची उपयुक्तता मनात साठवली आणि पुन्हा वर आलो.

तटबंदीला धरून बुरुज गाठला. बुरुज सुद्धा अस्तित्व दाखवणारा ... बुरुजावरच्या जरी पटक्याला मुजरा केला .. आणि परतीची वाट धरली.

खास लोकाग्रहास्तव फलटण बस स्थानकासमोरील पुरी भाजी साठी थोडी वाट वाकडी केली. एवढ्या भर उन्हात केलेल्या मोहिमेनंतर पुरी भाजीचा फडशा पडणार हे वेगळं सांगायला नकोच !!! त्यावर ताक आणि लस्सीच्या आवर्तनाने जो तृप्तीचा अनुभव मिळाला त्याला तोड नाही. गडभ्रमंती ला 'पुनःश्च ' हरिओम करण्याचे ठरवून पुण्याचा रास्ता धरला.

मार्च महिन्याचे पण मे महिन्याचे वाटणारे ऊन ...  तिशी पार झालेली वय  ... मोहिमांमध्ये पडलेला खंड ... हे असूनही बऱ्याच काळानंतर झालेली मोहीम खऱ्या अर्थाने जीव 'संतोषू'न गेली !!!

Tuesday, June 28, 2016

दशकपूर्ती - 'पुणे' कर म्हणून

                                हो.. दहा वर्ष झाली पुण्यात येऊन अर्थात पुणेकर होऊन. असाच जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. नोकरीच्या शोधार्थ पुण्यात पाऊल टाकले होते. एक मनाशी पक्कं होतं. पुण्यात यायचं ते खुल्या मनाने. पुण्याला आपलं मानायचं. नाशिकबद्दल नक्क्कीच प्रेम होतं ... आहे. पण म्हणून पुण्यात आल्यावर या शहराबद्दल नकारात्मक भावना नाही ठेवायची हे पक्कं होत. पुणं समजून घ्यायचं.  'पुणे'कर व्हायचं ! कारण शेवटी 'गंगा गये गंगादास!! जमुना गये जमुनादास !!!'

आज दहा वर्ष झाली. आयुष्यातले बरेच महत्त्वाचे टप्पे ( नोकरी, घर, लग्न ) इथेच झाले. पुण्याने आणि पुणेकरांनी सामावून घेतले. खुप जवळचे मित्र लाभले.

वारी पासून सवाई पर्यंत,
                        गुडलक पासून गडभ्रमंती पर्यंत 
                                        आणि मिसळीपासून गणेशोत्सवापर्यंत  !!!
                                                                खूप अनुभवलं इथे...
                                                                                   जिवाभावाचे मैतर लाभले.

                                                      धन्यवाद पुणे !!!


(ता.क.: कुठल्याही गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगायलाही शिकलोय आता !)  

Saturday, June 11, 2016

एक वारी अशीही ...


                                ठिकाण मु.पो. राख.... तालुका पुरंदर ..... जिल्हा पुणे .... एका पाझर तलावासाठी काम करणारे बेचाळीस हात ... आणि दिवसाच्या शेवटी उभ राहिलेल एक ओबड~धोबड़ दगडी चित्र !! पर्सिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून एक दिवस श्रमदान करण्याची संधी मिळाली आणि एक अनामिक समाधान देऊन गेली . 
                               समविचारी २१ लोक शनिवारची हक्काच्या सुट्टीला 'सुट्टी' देऊन सकाळी सातला हजर होते. मोरयाचा गजर झाला आणि वारीला सुरुवात झाली. आंबेगाव कात्रज कोंढवा मार्गे गाड़ी सासवड रस्त्याला लागली. समविचारी मित्रांची वैचारिक देवाण घेवाण सुरु झाली. प्रत्येकाकडे एक 'स्टोरी' होती आणि एक 'नवकल्पना'. ख़रच या कल्पना प्रत्यक्षात आल्या तर् ... या स्वप्नातून बाहेर यायला रस्त्यावरचा एक खड्डा पुरेसा होता. जेजुरीत चहा पिऊन पंढरपूर रस्ता सोडला आणि राख गावच्या ऱस्त्याला लागलो. 
                                 राख हे पुरंदर तालुक्यतले  दोन हजार लोकांचे दुष्काळी गाव.. प्रत्येक उंबऱ्याशेजारी असलेला भला मोठा पाणी साठवायचा ड्रम डोळ्याला टोचत होते. गेले दोन वर्षातल्या दुष्काळामुळे गावात पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होते. पुण्याहुन दगडूशेठ ट्रस्ट तर्फे दोन टँकर आणि जेजुरी देवस्थानचे दोन टँकर यावर गावचा गाड़ा चालू होता. आधीच नाव राख आणि त्यात टँकरने पाणी पुरवठा त्यामुळे गावाचा अपभ्रंश 'टँकरवाडी'. गावापासून दोनेक किलोमीटर अंतरावर याच गावाला उपयुक्त ठरेल असा बंधारा इतके दिवस पडिक होता. या उन्हाळ्यात या बंधाऱ्याचे रुंदीकरण, गाळ काढणे, झाड़ाझुडपांची साफसफाई,  सपाटिकरण, खोलीकरण, बंधाऱ्याच्या भिंतीची उंची वाढवणे आदि कामे चालू होती. प्राथमिक कामाची माहिती दिल्यावर प्रत्येकजण warmed Up  झाला. 
                                  आम्हाला बंधाऱ्याच्या भिंतीचा एक भाग साफ करून समतल करणे आणि नंतर त्यावर दगडांचा थर टाकणे हे काम होते. निसर्गराजानेही उत्तम संकेत दिले. वातावरण ढगाळ आणि पावसाळी होते. कीबोर्डवर झरझर चालणारे हात श्रमदानातही सफाईदार चालत होते. बारा बारा तास एसीच्या हवेत डोक लढवणारे इथेही तितक्याच् वेगाने काम करत होते. साफसफाईचा पहिला टप्पा संपल्यावर सपाटीकरण सुरु झाले. आमच्यातल्या ग्रामीण पार्श्वभुमीच्या मुलांचा अनुभव कामी आला. त्यांनी कुदळ फावड़ा घेऊन या कामात आघाडी घेतली. सपाटीकरणानंतर मोजणी झाली आणि सीमा रेखा आखल्या गेल्या. चार मानवी साखळ्या करून दगडाची वाहतूक सुरु झाली. एका पाठोपाठ एक कधी हलका कधी अवजड ! याच कामात गावकऱ्यांनीही सहभाग नोंदवला.गावातल्या महिला सरपंच ताईंसुद्धा स्वतः  सहभागी झाल्या. मानवी साखळीचे उत्तम चालू होते. ठराविक काळाने साखळीतला वरचा गट खाली येत  होता आणि खालचा गट वर जात होता. दोन तासाच्या श्रमानंतर 'श्रमपरिहार' तर आवश्यकच होता. बंधाऱ्याच्या पात्रातच जेवणाची पंगत बसली. एवढी अंगमेहनत केल्यावार जेवणाची जी चव लागते नं …. एकदम बेष्ट !!! गावकऱ्यांनी जेवणाची उत्तम सोय केली होती. जेवणानंतर पुन्हा एकवार मानवी साखळी लागली आणि दगड वाहतूक सुरु झाली. म्हणता म्हणता दीड तासात दगडी नक्षी पूर्ण झाली. झालेल्या कामाबरोबर ग्रुप फोटो घेऊन over and out घोषित झाले. काम झाल्यावार सगळ्यांनी ट्रक्टर राईडचा मनमुराद आनंद लुटला. बंधाऱ्यात पाणी भरल्यावर गावाला पुन्हा भेट देणार या बोलीवर … गावकऱ्यांचा निरोप घेऊन आमची गाडी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 
                                   असं म्हणतात … पाठ टेकल्यावर शांत झोप लागते तो सुखी माणूस… आजच्या दिवसापुरता का होईना त्या सुखी माणसाचा सदरा गवसला होता !!!


ता. क.: वय वर्ष १२ ते वय वर्ष ८५ ही काम करणाऱ्या लोकांची रेंज होती. १२ वर्षाचा चुणचुणीत संस्कार आपला वाटा चोख उचलत होता तर ८५ वर्षाचे आजोबा दगड कसे लावायचे याचे अनुभव सांगून आमचा उत्साह द्विगुणीत करत होते.  

Monday, December 15, 2014

Apologies :( :(

Apologies for taking break in between :(

World Cup Cricket Statistics !!! .... (60 Days to Go!)

Boring Bowlers !


        List of bowlers who bowled Maximum bowlers and bowled Maidens !!!


Player Team Maidan Overs World Cup Edition
Glen McGrath Australia 42
Chaminda Vaas Sri lanka 39
Sir Richard Hadlee New Zealand 38
Shaun Pollock South Africa 37
Ian Botham England 33
P DeFreitas England 30


      Highest maidan overs by Indian Bowler is Kapil Dev who bowled 27 Maidan Overs in world Cups

Player Team Maidan Overs World Cup Edition
M Muralitharan Sri Lanka 343.3 1996-2011
Glen McGrath Australia 325.5 1996-2007
Wasim Akram Pakistan 324.3 1987-2003
J Shrinath India 283.2 1992-2003
Shaun Pollock South Africa 269 1996-2007

....60 Days to Go

Thursday, November 27, 2014

World Cup Cricket Statistics !!! .... (80 Days to Go!)

Captains Knock !


                             Following Captains played Captains knock when situation demanded and sailed respective team to HOME.. !!!

Maximum Centuries as Captain

Player
Team
Centuries
World Cup Edition
Rickey Ponting
Australia
4
2003-2011
Saurabh Ganguly
India
3
2003
Stephan Fleming
New Zealand
2
1999-2007
Glen Turner
New Zealand
2
1975-1975
           

Maximum 4 For's as Captain

  
Player Team 4-for's wickets World Cup Edition
Shahid Afridi Pakistan 2 2011
Imran Khan Pakistan 2 1987
Kapil Dev India 1 1983
Asif Iqbal Pakistan 1 1979
         
                             Pakistani Player has the dominance on above list featuring 4 captains. Shahid Afridi's double 4 fors are actually 5 for's. Other than that Kapil Dev is only Captain who holds record for 5 for's in World Cups.


....80 Days to Go


Wednesday, November 26, 2014

World Cup Cricket Statistics !!! .... (81 Days to Go!)

Lucky.. Unlucky.. Luckiest !!!


                                Following is the list of few lucky Teams who held good record of winning the Toss and winning the Match. Australia has maximum percentage of winning matches after winning toss making them Most lucky Team !



Team
Toss Won
Match Won
Percentage
Australia
42
29
69.04%
SA
19
11
57.89%
New Zealand
37
21
56.75%
England
39
22
56.41%
West Indies
27
15
55.55%
India 
32
16
50%
                                On the other hand Kenya is unlucky team who has lowest winning percentage after winning the Toss.


Team
Toss Won
Match Won
Percentage
Kenya
13
2
15.38%
Netherlands
12
2
16.66%
Zimbabwe
29
5
17.24%
Bangladesh
10
3
30%
                     
                                 Apart from above mentioned Teams, Sri Lanka and Pakistan has less then 50% winning percentage after winning Toss.


 Luckiest Teams: Teams who lost the toss but still produced WIN. Australia leading the list with winning 76% of matches after loosing Toss. South Africa, India, England and Pakistan are others who has more than 60% wins after loosing Toss

Team
Toss lost
Match Won
Percentage
Australia
34
26
76.47%
South Africa
28
19
67.85%
India 
35
23
65.71%




....81 Days to Go