सध्या भारतात सर्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे लोकपाल विधेयक.. या विधेयकावरुन आज देशात जो प्रचंड गदारोळ चालला आहे त्यानिमित्ताने उपस्थित हॊणारे काही मुद्दे...
थोडे इतिहासात बघितले तर.. हे विधेयक प्रथम चर्चेला येउनही आता 35 वर्षाचा काळ उलटुन गेलाय. गेले 35 वर्षे आपण ह्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करु शकलो नाही हे केवढे मोठे दुर्दैव...
आज आण्णांनी त्यासाठी आंदोलन उभ केलय.. त्याला ते स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणतात... खरय.. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाईच आहे.. आणि त्यांच्या हेतुबद्दल शंका घेण्याची काहीच आवश्यकता नाही.
congress सरकारला आण्णांचा मसुदा मान्य नाही.. किंबहुना सरकारला हे विधेयक आणण्यातच उत्सुकता नाही.. त्यामुळे हे वेळकाढुपणासाठी निमित्त आहे.. सरकार आण्णांवर हुकुमशाहीचाही आरोप करते.. पण त्यात काहीही तथ्य नाही. आण्णांनी हे कधीच म्हटले नाही की आमचाच मसुदा मान्य करा.. सरकार तो मसुदा संसदेत मांडु शकते. तिथे जर का विधेयक नामंजुर झाले तर आण्णा तो अंतिम मानण्यास तयार आहेत पण सरकारला भिती आहे आपले पितळ उघडे पडण्याची... सरकारचा आणि एक आरोप आहे की टीम आण्णांमधे मतभेद आहेत.. हा तर सरकारचा "फ़ोडा आणि राज्य करा" ह्या इंग्रज सरकारच्या नितीसारखा प्रकार झाला.. सरकार लोकांचे आंदोलनावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतेय.. सरकार याच बरोबर दुट्टपीपणा ही करतय... एका बाजुला आम्ही हे विधेयक आणू म्हणायचे परंतु कॄती काहीही करायची नाही.. आणि दुसऱ्या बाजुने आम्ही आण्णांचे उपॊषण मोडुन काढु म्हणुन भाषा करायची.. यात सरकार स्वतःचेच हसे करुन घेत आहे.
विरोधी पक्षाची ह्यात सध्यातरी काही भुमिका नाही. कारण सध्या आमच्याकडे प्रबळ विरोधी पक्षच नाही. त्यानी आज जरी आण्णांच्या बाजुने भुमिका घेतली असली तरी ती उद्या तशीच राहील याची शक्यता नाही...
या सर्व आंदोलनात सामान्य जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली.. खरच स्वागतार्ह आहे.. बऱ्याच वर्षाने एका रचनात्मक मुद्द्यावर अवघी जनता एकत्र आली.. पण लढाई अजुन बाकी आहे.. अर्थात हा कायदा म्हणजे काही जादुची कांडी नाही.. की हा कायदा आला म्हणजे साऱ्या भ्रष्टाचाराचे निर्मुलन होईल आणि सारा भारत भ्रष्टाचारमुक्त होईल असे नाही.. पण भ्रष्टाचारावर आळा बसेल हे नक्की.. माहीतीच्या अधिकाराची ही फ़ळे आज आपण उपभोगतोच आहे...
कदाचित ह्या विधेयकाच्या आंदोलनामुळे सरकारही पडेल.. पण आपण विधेयक मंजुर होईस्तोवर हा लढा कायम ठेवला पाहीजे..
लोकपाल विधेयक जिंदाबाद ....
~~~ मोCoool...
No comments:
Post a Comment