दिनांक १६ जानेवारी - वार शनिवार - ठरलं मोहीम - किल्ले मृगगड.
नववर्षाला (२००९) ला सुरुवात झाली. पहिली मोहीम ठरली मोहीम - किल्ले मृगगड. गड मीच सुचवला आणि सर्वांनी मान्यता दिली. बऱ्याच चाळण्या मारून शेवटी ५ जण उरले. अभिच्या मरीना उर्फ मारिया (!) ने जायचे ठरले. सकाळी ६.०० ला एरंडवणा सोडले. आकुर्डी रेल्वेस्टेशन वर चहा पिऊन, विनोद ला उचलून आम्ही पंचमहाभूते (अभी, राम, विनोद, अमर आणि मी) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोलीकडे प्रस्थान केले. खोपोलीहून पाली रस्त्याला लागल्यावर लगेचच सकाळच्या ब्रेकफास्टसाठी (अरे ब्रेकफास्ट सकाळीच करतात. असो.. त्यावर वेगळा पोस्ट नंतर कधीतरी... ) थांबलो. पोहे २० रुपये बाबत विचारले असता मालकाकडून " सध्या महागाई वाढली आहे साहेब!!! " हा सल्ला दानावर दक्षिणा सारखा ब्रेकफास्ट वर फुकट मिळाला.
तेथेच माननीय विनोदराव भोईटे यांचा अखिल (?) गडकरी मंडळातफे श्रीफळ, पुष्पहार आणि हातरुमाल देऊन जाहीर नागरी (?) सत्कार करण्यात आला. (मोलाचे सहकार्य--अमर गायकवाड, मंडळ अमरचे सहर्ष आभारी आहे !!!). थोडक्यात बऱ्याच दिवसांनी मोहिमेवर येण्याची कृपा केल्याबद्दल हा सत्कार होत होता. (हा बाकीच्यांना इशारा आहे.)
हिरवी झाडे, छोटी छोटी गावे मागे टाकत टाकत एका अवघड वळणावर थबकलो. तेथे एक दुचाकीस्वार रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमूळे घसरून पडला होता. आम्ही तत्परतेने आमच्याकडील प्रथमोपचार पेटी वापरून प्रथमोपचार केले आणि जेथे रस्त्यावर ऑईल सांडले होते तेथे माती टाकून पुढील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना सुखावून गेली.
वळणावळणाचा रस्ता, दुतर्फा हिरवी झाडे, उंबरी, सेमडी, नाणोसे,परळी हि गावे मागे टाकत जांभूळपाडा गाव गाठले (हेच ते जांभूळपाडा गाव जे १९९७-९८ च्या सुमारास प्रचंड पुरात अक्षरशः वाहून गेले होते). जांभूळपाड्याला खोपोली-पाली रस्ता सोडून गाडी भेलीव च्या दिशेने गाडी वळवली. दिशादर्शक पाट्यांचा आभाव आणि कोरे मैलाचे दगड त्रास देत होते. काका , तात्या, बाळ्या, नाम्या ला विचारत विचारत भेलीव गावात पोहोचलो. भेलीव गावात चारचाकी न्यायाची असल्यास नदीपात्रातून न्यावी लागणार हे लक्षात आल्यावर काही अंतर अलीकडेच सावलीत गाडी लावली आणि मोहिमेला सुरवात झाली.
पहिल्या नजरेत गड अगदीच किरकोळ वाटला. आणि हा गड झाल्यावर आणि काय बघायचे याच्या योजना सुरु झाल्या. ( खंर तर गड मनातल्या मनात म्हणत होता वर या तर खंर मग बघू !). गावकऱ्यानी गडाला जायची वाट सांगितली. गावात एक शाळा आहे. एक भवानी मातेचे मंदिर आहे आणि उजव्या बाजूस वस्ती आहे. ७०-८० उंबऱ्यांचे ३००-४०० लोकवस्तीचे भेलीव हे एक टुमदार गाव.नववर्षाला (२००९) ला सुरुवात झाली. पहिली मोहीम ठरली मोहीम - किल्ले मृगगड. गड मीच सुचवला आणि सर्वांनी मान्यता दिली. बऱ्याच चाळण्या मारून शेवटी ५ जण उरले. अभिच्या मरीना उर्फ मारिया (!) ने जायचे ठरले. सकाळी ६.०० ला एरंडवणा सोडले. आकुर्डी रेल्वेस्टेशन वर चहा पिऊन, विनोद ला उचलून आम्ही पंचमहाभूते (अभी, राम, विनोद, अमर आणि मी) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोलीकडे प्रस्थान केले. खोपोलीहून पाली रस्त्याला लागल्यावर लगेचच सकाळच्या ब्रेकफास्टसाठी (अरे ब्रेकफास्ट सकाळीच करतात. असो.. त्यावर वेगळा पोस्ट नंतर कधीतरी... ) थांबलो. पोहे २० रुपये बाबत विचारले असता मालकाकडून " सध्या महागाई वाढली आहे साहेब!!! " हा सल्ला दानावर दक्षिणा सारखा ब्रेकफास्ट वर फुकट मिळाला.
तेथेच माननीय विनोदराव भोईटे यांचा अखिल (?) गडकरी मंडळातफे श्रीफळ, पुष्पहार आणि हातरुमाल देऊन जाहीर नागरी (?) सत्कार करण्यात आला. (मोलाचे सहकार्य--अमर गायकवाड, मंडळ अमरचे सहर्ष आभारी आहे !!!). थोडक्यात बऱ्याच दिवसांनी मोहिमेवर येण्याची कृपा केल्याबद्दल हा सत्कार होत होता. (हा बाकीच्यांना इशारा आहे.)
हिरवी झाडे, छोटी छोटी गावे मागे टाकत टाकत एका अवघड वळणावर थबकलो. तेथे एक दुचाकीस्वार रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमूळे घसरून पडला होता. आम्ही तत्परतेने आमच्याकडील प्रथमोपचार पेटी वापरून प्रथमोपचार केले आणि जेथे रस्त्यावर ऑईल सांडले होते तेथे माती टाकून पुढील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना सुखावून गेली.
वळणावळणाचा रस्ता, दुतर्फा हिरवी झाडे, उंबरी, सेमडी, नाणोसे,परळी हि गावे मागे टाकत जांभूळपाडा गाव गाठले (हेच ते जांभूळपाडा गाव जे १९९७-९८ च्या सुमारास प्रचंड पुरात अक्षरशः वाहून गेले होते). जांभूळपाड्याला खोपोली-पाली रस्ता सोडून गाडी भेलीव च्या दिशेने गाडी वळवली. दिशादर्शक पाट्यांचा आभाव आणि कोरे मैलाचे दगड त्रास देत होते. काका , तात्या, बाळ्या, नाम्या ला विचारत विचारत भेलीव गावात पोहोचलो. भेलीव गावात चारचाकी न्यायाची असल्यास नदीपात्रातून न्यावी लागणार हे लक्षात आल्यावर काही अंतर अलीकडेच सावलीत गाडी लावली आणि मोहिमेला सुरवात झाली.
भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात केली. रस्ता समजत होता पण अंदाज येत नव्हता. तेवढ्यात 'पांडुरंग' अगदी देवासारखा धावून आला. (पांडुरंग हा भेलीव मधला एक मेंढपाळ जो नंतर आमचा वाटाड्या झाला) पांडुरंगसाठी भेलीवचा किल्ला म्हणजे काही नवीन गोष्ट नव्हती. त्याच्यासाठी तर ते रोजचेच काम होते. तो वाट दाखवायला तयार झाला आणि मुख्यत्वे अभिने सुटकेचा निश्वास टाकला.
पहिल्या टप्प्याची वाट पायवाटेची काहीशी सोपी आणि डोंगराच्या कातळाला समांतर अशी होती. थोडे चढण घेऊन आम्ही एका गुहेपाशी थांबलो. एक माणूस बसून जो शकेल अशी अंधारी गुहा होती ती. अमरची जिज्ञासू वृत्ती त्याला त्या गुहेत घेऊन गेली. मोबाईलच्या मिणमिणत्या प्रकाशात संशोधन करून अमर, अभी आणि विनोद असे तीन वीर परतले. पण हाती काहीच लागले नाही. एक धडा मिळाला. बरोबर कायम एक विजेरी असावी. (पुढील मोहिमेत यावर जरूर अंमल केला जाईल !!!). पुढे एका घळईतून वर चढलो. घळईने थोडी परीक्षा पहिली पण it's OK म्हणत पुढ गेलो. दुसऱ्या मार्गाने तेथे पोहोचलेल्या अमर ने एक good news दिली। काय ? " जोरदार वाराआहे... समोर उंच उभा कातळ आहे... त्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत... आणि त्या चढून आपल्याला जायचे आहे.... " बास्स॥ झालं... रामसह सर्वांनी मला शिव्या (त्या येथे टाकत नाही ;) ) दिल्या आणि "हाच किल्ला सापडला होता का?" सुनावले। थोडा मीहि बिचकलो. पण परत पांडुरंग धावून आला. पांडुरंगाने तो कातळ कडा अवघ्या ५ मिनिटात सर केला आणि मग थोडा धीर आला. थोडा वेळ राम ला पटवून, राजी करून ती तीन टप्प्यातली कातळ चढाई चढण्यास सुरुवात केली. जवळपास चाळीस एक फुटाच्या त्या कातळात मधेच काही पायऱ्या लुप्त होत होत्या. वारा प्रचंड वेगाने वाहत होता. तरीही सर्वांनी १५ मिनिटात ती कातळ चढाई यशस्वरीत्या पूर्ण केली आणि आजवरच्या किल्लेभ्रमंती मधील सर्वात अवघड चढाई म्हणून प्रशस्तीपत्रकहि देऊन टाकले. तेथे पांडुरंगाचे आभार मानून त्याला निरोप दिला. आमच्याकडची दोन सफरचंद दिल्यावर त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद केवळ अवर्णनीय!!!.
किल्ल्याच्या वरच्या भागात बघण्यासारखे फार काही नाही. पाण्याच्या टाक्यांचे काही अवशेष बघायला मिळतात. किल्ल्यावरून चारही दिशांचा परिसर उत्तमरीत्या न्याहाळता येतो. पूर्वेला दूरवर सरसगड दिसतो. मृगगडावरून समोर एक उंच सुळका दिसतो. अजून एक नमूद करण्यासाखी गोष्ट म्हणजे हा किल्ला प्रदूषण विरहित आहे. हि गोष्ट मनाला अत्यंत सुखावून गेली आणि " किल्ला जितका दुर्गम तितका तो स्वछ" या आमच्या प्रमेयाला सिद्धता मिळाली :)
किल्ल्यावर जेवण आणि घटकाभर विश्रांती घेऊन ( अर्थात राम कातळाच्या भीतीने तितकासा जेवला नाही) कातळ उतरायला सुरुवात केली. अमरच्या मार्गदर्शनाखाली रामने उत्तमरीत्या कातळ उतरण पूर्ण केली आणि अभिने तत्परतेने ते क्षण कॅमेरात कैद केले.( उगाच नाही नेत आम्ही त्याला;) ) कातळ उतरल्यावर उजव्या हाताला एक गुहा दिसताच अमरची संशोधक वृत्ती पुन्हा जागी झाली आणि अमर-विनोद-अभि खोदलेल्या पायऱ्यांवरून कसरत करत गुहा बघून आले. उतरताना फारसा काही त्रास झाला नाही आणि ४० मिनिटात भेलीव गाव गाठले. थोडा वेळ असल्याने जवळच असलेल्या घोटावडे धरणावर जाऊ असे रामने सुचवले. ३.३० ला भेलीव ला निरोप देऊन जांभूळपाड्याकडे गाडी वळवली. विचारत विचारत खोपोली-पाली रस्त्यावरील परळी गावापासून ४ किलोमीटर असणाऱ्या घोटावडे धरणापाशी पोहोचलो (एक उत्तम ठिकाण सुचवल्याबद्दल रामचे आभार !!! ) धरणाच्या काठावर बसून समोरील खळाळते पाणी बघून शीण कुठल्या कुठे गेला. धरणाच्या पाण्यावार दगडाच्या खेळाचा एक अंकहि झाला. (आणि त्यात अभि was undisputed WINNER :) )
लवकर अंधार पडायचा विचार करून ५.०० ला परतीच्या प्रवासा लागलो. आणि पुढील मोहिमाचे नियोजन आणि स्वप्नरंजनालाही सुरुवात झाली.
#######################################
हे लक्षात ठेवा !!!
#######################################
१. वाटाड्या बरोबर असू द्या. भेलीव गावात तो नक्की मिळेल.
२. गडावर पाणी नाही. पाण्याचा साठा बरोबर असू द्या.
३. बरोबर विजेरी असणे उत्तम
४. गडावर राहण्यास सोय नाही त्यामुळे हि मोहीम एक दिवसाचीच असावी.
5. आणि येता येता घोटावडे धरणाला नक्की जा !!!
~~~ मोCoool...