नव्वदीच्या दशकात जसे जसे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढायला लागले तसे तसे युती आणि आघाडी चे Concepts रुजायला लागले. अर्थात पुर्वीही हे प्रयोग झाले पण खऱ्या अर्थाने प्रयोग वाढले ते नव्वदीच्या दशकात.
भारतीय राजकरणात आजवर बऱ्याच युत्या झाल्या आघाड्या झाल्या.. बऱ्याच यशस्वीही झाल्या. सध्याच अस्तित्वात आलेली आघाडी म्हणजे ATM अर्थात आठवले, ठाकरे, आणि मूंडे (तुर्तास तरी यांचे Approval बाकी आहे). ही युती होते ना होते तोच.. चर्चा सुरु झाली ही युती किती दिवस टिकेल याची… साहजिकच आहे.. आजवर ज्या काही युत्या आणि आघाड्या झाल्या आणि टिकल्या.. त्यात सर्वात महत्वाचा सामान धागा होता विचारसरणीचा..
ATM युती जास्त काल टिकणार नाही हे पटायला बऱ्यापैकी वाव आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे विचारसरणीतली तफ़ावत. सेना-भाजप सारख्या so called जातियवादी पक्षांबरोबर जाण्याचा आठवले यांचा निर्णय नक्कीच विचारसरणीला छेद देणारा आहे. अर्थात यात सेना भाजपाचे समीकरण एकदम साधे आहे. आठवले यांचे राज्यसभेच्या सीट देऊन पुनर्वसन करायचे आणि त्या बदल्यात कायम आघाडीला जाणारी रिपब्लिकन मते खेचण्याचा प्रयत्न करायचा. पण या खेळात एक मोठा धोका आहे. आठवलेंच्या मागे सारी भीमशक्ति आहे आणि सारी रिपब्लिकन मते आहेत हे समजणे चुकीचे आहे. ज्या पक्षाचे स्वतःचे ५ वेगवेगळे गट आहेत त्यातल्या एक गटाकडे सारी मते कशी असू शकतील. राजकारणात नविन मित्र जोडावे .. जरुर जोडावे.. पण असे जोडावे ज्यात आपला फायदा आहे. आज तरी असे म्हणावे लागेल हे गोष्ट जोखण्यात युती कमी पडली. यात दूसरा मुद्दा येतो जागा वाटपाचा.. उद्या यांचा common minimum program अस्तित्वातही येईल पण जागा वाटपाचे काय? आज जेथे सेना भाजपा मधेच जागा वाटपबद्दल मतैक्य नाहीं आणि अनेक ठिकाणी असंतुष्ट उमेदवाराने मते खाल्ल्यामुळे पराभव होते तिथे आणि तिसर्यासठी जागा सोडायच्या... हे खरच खुप interesting आहे. कोणत्याही पक्षाचा एक मुख्या अजेंडा असला पाहिजे की आपली वोट बैंक अबाधित राखणे आणि ती वाढवण्याकडे भर देणे. आज परिस्थिती अशी आहे की युतीची वोट बैंक घसरतेय. ती वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी ही अजब युती करून सेना भाजपा वाले काय साधत आहेत कोणास ठाऊक. या जागा वाटपाच्या घोळामुळे युतीला असलेल्या अपेक्षित फायद्यापेक्षा निष्ठावंतांना डावलुन होणारे नुकसानच जास्त दिसते आहे.
आता थोड़े आठवलेंच्या बाजूने विचार करू. आठवलेंची पण या युती मागे काही समीकरणे आहेत… नक्कीच आहेत. इतके वर्ष कायम पाठिंबा देऊन पदरात काहीही न पडल्यावर साहजिकच माणुस दुसऱ्या घरोब्याचा विचार करतो. आठवलेनींही तेच केले. त्यांना आता सत्तेत भागीदारी हवी आहे. पण हे करताना त्यांनी सच्च्या रिपब्लिकन वोट बैंकेला दुखावले. नेत्याने पदाची अथवा सत्तेची हाव धरु नए असे म्हणतात. सत्तेत न राहुनही जनसेवा करता येते. पण सध्यातरी सर्वसामान्य जनतेत आठवले फ़क्त सत्तेसाठी युती करत आहेत असा समज आहे. आणि वैयक्तिक स्वार्थासाठी संपुर्ण पक्षाला वेठीस धरणे घातक ठरू शकते. ही युती आठवले यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि जर का ही युती यशस्वी झाली नाही तर कदाचित आठवलेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी होऊ शकते. आज जरी पवार साहेब म्हणत असले की आठवलेंसाठी दरवाजे उघडे आहेत पण खऱ्या आता आघाडीला आठवलेंची गरज नाही. आणि वापरा अणि फेकून द्या ह्या तत्वानुसार वागणारी राष्ट्रवादी त्याना आपलेसे करुन घेण्यासही उत्सुक नसेल.
त्यामुळे आठवले यांची झालेली राजकीय गोची.. आणि यातून ते आणि त्याचा पक्ष कसा मार्ग काढतो यावरच ATM च भवितव्य अवलंबून आहे… पण चित्र तितकेसे आशादायक नाही.
ता.क.: नुकत्याच हाती असलेल्या बातमीनुसार तुर्तास मुंडे भाजपा मध्येच राहणार आहेत. So M is still there in ATM..
~~~ मोCoool...
Good Going, I could not understand everything you have written but enjoyed few lines.
ReplyDeletehttp://testadda.blogspot.com/
ReplyDeleteRead my blog if you get some time :)