Saturday, March 6, 2010

V.R.S.(वाळवंटात राहणे सोडणे !!! )

माझा एक मित्र म्हणतोय V.R.S.घेणार
आयटी मधून V.R.S. घेणारा पहिला माणूस होणार...

रोजच्या coding अन testing ला वैतागलोय पुरता
दिवसरात्र अन रात्रंदिवस माझा ऑफिसमध्ये राबता...

project estimation करता करता स्वतःची किंमत ठरवतोय
त्या पलीकडच आयुष्य मात्र सोयीस्कररीत्या विसरतोय...

Project Plan करताना तारखा डोक्यात फिट्ट बसवतोय
जवळच्या मित्राचा वाढदिवस मात्र डोक्यातून निघून जातोय...

आजचा drop , उद्याचा milestone, परवाच Release
रोजच्या late night मूळे हरवली आहे life ची ease...

हरवलेला आनंद पुन्हा मिळवण्या दोन घटका
मारतो कधी कधी मित्र मंडळींबरोबर फेरफटका...

पण हा आनंद जेवणातल्या केवळ sweet dish सारखा
अन उरलेल्या नावडत्या भाजीसमोर मी उभा अभिमान्युसारखा...

मी त्याला टोचलं म्हटलं V.R.S. नंतर काय प्लान
म्हणतो गावाकडं जाईन करून सगळी शस्त्र म्यान...

शेती करीन गावाकडं त्यात नवीन तंत्र आणीन
पण तेथे माझ्या मनाचा खुद्द मीच मालक असीन...

हळूच तो V.R.S.च्या सुंदर स्वप्नात रमतो
मीही तितक्याच तत्परतेने त्याला वर्तमानात आणतो...

वर्तमानाचे भान येताच तो होतो हिरमुसलेला
परंतु तरीही लढण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन सज्जलेला
भविष्यातील आनंदकण वेचण्यासाठी आसुसलेला
आणि म्हणूनच V.R.S.च्या मृगजळाकडे पाठ फिरवून सदैव पुढे चाललेला...

~~~ मोCoool...


3 comments: