Tuesday, March 2, 2010

आमचे पाव-शतक आणि रक्तदानाच दशक !!!

मागच्या आठवड्यात आमचे ( येथे 'आमचे' हे आदरथी एकवचन आहे ) पावशतक पूर्ण झाले. ( लोक ढोबळमानाने पन्नाशीनंतर आर्धी लाकडं पोहोचलीत असं म्हणतात.. मी आता चतकोर म्हणतो ;) ) आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडल्याचा अनुभव घेतोय. काही लोक वाढदिवसाला दुखः करतात. एक वर्ष कमी झाले म्हणून शोक करतात. खरा तर वाढदिवस हा तुम्हाला दरवर्षी जाणीव करण्यासाठी असतो .. वर्षागणिक वाढलेल्या जबाबदारीची ... येणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देण्याची क्षमता निर्माण करण्याची...

या वर्षीही नेहमीप्रमाणे रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. यंदा दहाव्यांदा रक्तदान केलं. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. आणि याच भावनेतून केलेलं रक्तदान एक वेगळाच समाधान देतं. आणि ह्या वेळेचं वैशिष्ट म्हणजे वाढदिवसाची भेट म्हणून पुणेरी अस्मितेचे प्रतिक असलेली 'पुणेरी पगडी' मुरुडकर झेन्डेवाल्यांकडून घेतली.

मागे वळून पाहताना आठवणीचा चित्रपट सरसर डोळ्यासमोरून सरकत जातो.
आजवरच्या आयुष्यातल्या काही ठळक नोंदी. :-

१. बालवाडीत कविता वाचनात मिळवलेले बक्षीस( ते प्रशस्तीपत्रक आजही माझ्या जवळ आहे )
२. बाबांनी माझ्यासाठी सायकलला बसवलेले छोटे सिट
३. दुसरीत असताना दोनशे मुलांसमोर केलेलं १५ ऑगस्ट चा भाषणं
४. चवथीत असताना सहलीकारता नेलेले आणि नंतर हरवलेले ५० रुपये... सहलीला न जाण्याची मिळालेली शिक्षा... आणि त्यातून मिळालेला वस्तू आणि पैसे सांभाळण्याचा आणि त्याची किंमत समजण्याचा धडा...
५. 'नटसम्राट' हे काय आहे हे कळत नसणाऱ्या वयात fancy ड्रेस स्पर्धेत उभा केला "नटसम्राट"
६. बाबांचा विरोध डावलून आईने आणून दिलेली पतंग, मांजा, भिरभिरे आणि दिवाळीच्या दोन दिवसआधी आणून दिलेले फटाके.
७. दहाव्या वाढदिवसाला घेतलेली सायकल
८. कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी आयोजित बालकवी संमेलनात सदर केलेली कविता
९. एका ओवर मध्ये २२ runs हवे असताना अनपेक्षितरित्या मी केलेली तुफान फटकेबाजी आणि विजयानंतर माझ्या टीमने मला डोक्यावर घेऊन केलेलं जल्लोष
१०. बाराव्या वर्षी रायगड सर केल्याचा थरारक अनुभव.
११. चित्रकलेच्या परीक्षांमुळे चित्रकलेशी आलेला संबंध... एक colourful experience !!!
१२. तेराव्या वर्षी बाबांनी दसऱ्याला गाडीची पूजा करता करता अचानक पहिल्यांदा गाडी चालवायला दिलेली संधी
१३. सलग तीन वेळा आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत मिळवलेल वैयक्तिक अभिनयाचे बक्षीस
१४. आठवीत आणि नंतर engineering ला असताना अनुक्रमे प्रशांत दामलेची आणि अशोक सराफ यांची घेतलेली मुलाखत.
१५. नववीत असताना ऐकलेलं जॉर्जे फर्नांडीस यांचे भाषणं
१६. दहावीच्या महत्वाच्या वर्षी माझा आहार, आजार आणि अभ्यास सांभाळणारी आई आणि अडल्यावेळी कायम माझ्या मागे धावणारे अगदी नादुरुस्त सायकल दुरुस्त करून क्लास पर्यंत आणून देणारे बाबा
१७. दहावीला कमी मार्क्स मिळाले म्हणून रडणारा मी आणि एवढे मार्क्स मिळूनही रडणाऱ्या माझ्याकडे आश्चर्याने बघणारे आई बाबा
१८. दहावीच्या सुट्टीत भोंसला मिलिटरी स्कूल मध्ये घालवलेला एक महिना... एक great learning experience आणि आयुष्याकडे बघण्याची मिळालेली दृष्टी
१९ . बारावीची मार्कशीट हातात पडल्यावर chemistry ले ९६ मार्क बघून "ही माझीच मार्कशीट आहे का?" असे विचारणारा मी आणि बारावीच्या यशाबद्दल आख्या सोसायटीमध्ये अभिमानाने मिरवणारी आई आणि खास प्रसंगासाठी सुप्रसिद्ध "पांडे मिठाई"चे पेढे आणायला धावलेले बाबा ...
२०. बारावीनंतरच्या सुट्टीत बाबांच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनुभवलेले एक नवीन वेगळे काहीसे व्यावहारिक जग
२१. engineering कॉलेजला कायम मार्गदर्शन करणारे ठिगळे सर
२२. first क्लास engineer झाल्यानंतर पदवीदान समारंभात मिळालेली पदवी आणि अभिमानाने काढलेला फोटो
२३. माझ्या नोकरी निमित्त गाव सोडण्याच्या निर्णयाला तात्काळ होकार देणारे आई-बाबा
२४. कात्रज- सिंहगड मोहिमेपूर्वी झालेली बाबासाहेब पुरंदरे यांची संस्मरणीय भेट (बाबासाहेब हे आमचे दैवत आहेत)
२५. कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले काका, काकू, दादा, ताई, वाहिनी आणि सर्व नातेवाईक आणि आजवर मला लाभलेले शाळा , कॉलेज, engineering कॉलेज आणि कंपनीतले मित्र-मैत्रिणी आणि माझं नाशिक आणि आता गेल्या चार वर्षापासून माझे पुणे .....

आता फार हलकं हलकं वाटतंय....

~~~
मोCoool...

1 comment:

  1. Khup ch sundar... Chhan vatala... Khara tar prtyek vadh divasala sartya ayushyatale ase thalak prasang athvatat ch... Pan tyla shabd swaroop dyaych kahi suchala navata... (Aashcharya ahe mhana...) Pan he vachun khup ch chaan vatala... Khar ch Halaka halaka vatatay... Keep It Up MoCool...

    ReplyDelete