Monday, February 22, 2010

माझी जन्मभूमी...

वेळ साधारणतः संध्याकाळच्या साडेसात, नाशिकहून पुण्याला येणार्‍या बसमधे संगमनेर गावाबाहेर ट्रॅफिक मधे फसलॉ होतो. वाईट कंटाळा आला होता. गाडी अक्षरशः मुंगीच्या गतीने पण सरकत नव्हती. आणि काही ओळी सूचल्या

ही आहे कथा माझ्या जन्मभूमीची
जुनेच गाव पण पालटलेल्या त्याच्या रूपाची...

रस्ते झाले रुंद आले नीऔन साइन
द्राक्षाबरोबर फेमस झाली फेसळाती वाइन

वाडे पडले मौल आले पुसल्या जुन्या खुणा
जुने लोक जुन्या खुणा आठवतात पून्हा पून्हा

तरी नाही बदलला शहराचा स्थायीभाव
टोपीवाल्या चिवडेवाल्या काकांचा प्रेमभाव


अशीच आहे माझ्या गावाची कहाणी
परंपरा जोपासात आणले बदलाचे पाणी

खर तर बदल हीच अबाधित गोष्ट असते
परिस्थितीनुरूप बदलण्याची मनुष्याची मानसिकता असते

अनुभवत होतो आधुनिकतेकडचि वाटचाल
बदललेल्यागावाच्या रूपड्याला माझा मनोमन सलाम !!!

~~~
मोCoool...

No comments:

Post a Comment